Saturday, June 8, 2013

WE LOVE AYURVED
C/o Yogeshwari stores, near Tulsimata Pandurang Temple, Odlembhat, Taleigao Goa 403002  Ph: 2451143
._______________________________________________________________________
1.    सरकारने किडणीच्या रोग्यांकडून आयुवर्दिक उपचार पद्धतीमध्ये एक महीना उपचार करून घेतला आहे असे संमतीपत्र घ्यावे अन मगच डायलेसीससाठी होणारा खर्च देण्यात यावा.

2.    आयुर्वेदानुसार किडणीच्या रोगावर (मुख्यत्वे सिआरएफ केसीस) कसे उपचार करावे याचे संशोधन वैद्य रघुविर भीडे यानी केलेले आहे. CRF केसेस वर उपचार सुरू करण्यासाठी, सखोल संशोधनासाठी व आयुवर्दिक औषधे वापरायला सोपी अन लगेच समजण्यायोग्य करण्यासाठी सरकारने 1 कोटीची मदत गोमंतक आयुर्वेदीक महाविद्यालय, शिरोडा याना करावी.

आयुर्वेद चिकित्सा पद्धतीतील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व रत्नागिरीतील वैद्य रघुविर (प्रमोद) भीडे आयुर्वेद शास्त्रात असलेल्या विविध माध्यमाद्वारे वेगवेगळ्या व आव्हानात्मक ठरलेल्या रोगावर उपचार शोधण्यात यशस्वी ठरलेले आहेत. गोव्यातील काणकोण भागात गेली अनेक दशके भेडसावणारी ओळखून म्हणजेच मानवी शरीरातील किडणी काम करायचे बंद झाल्यावर, ती केवळ बाह्य उपचार पद्धतीने रोग्याला डायलेसिस वर ठेवून व हळू हळू डायलेसीसचे प्रमाण वाढवत वाढवत तग धरायला लावणार्‍या पद्धती पाहून तीन वर्षापुर्वी संशोधन सूरू केले.

गेले वर्षभर वैद्य भीडे महिन्याच्या पहिल्या रविवारी ‘सेवा संकल्प’ व ‘सिनीयर सिटीझन फोरम’ नी सूरू केलेल्या माताजी मंदिर, टेंबेवाडा काणकोण येथे मासिक चिकीत्सा केंद्रात तेथील किडणी रोग्यांवर उपचार करण्यासाठी येत आहेत तसेच युथ हॉस्टेल, मिरामार पणजी येथे दर महीन्याच्या दुसर्‍या रविवारी किडणी रोग्यांवर उपचार करण्यासाठी येत आहेत यामध्ये त्यांना बर्‍यापैकी यश मिळाले आहे. काणकोण आणि पणजी येथे वैद्य भीडेंकडे उपचार करित असलेल्या 26 CRF रोग्यांबाबतचा थोडक्यात महिती खाली दिली आहे
Result Summary            Avg.
Creatinine Decrease
15.77%
Avg. Urea Decrease
19.01%
Avg. HB Increase
25.28%
Avg. Urine Increase
73.28%

या उपचारदरम्याने त्यानी दर महीन्यात रोग्यांमध्ये होणारी सुधारणा पाहिली. त्याच्यातील रक्त निर्माण करणार्‍या अन रक्त शुद्धीकरकरण करणार्‍या पेशी  (creatinine & blood urea level) मध्ये वाढ झाल्याचे दिसून आले तर काही रोग्याच्या मुत्रामध्येसुद्धा बरीच सुधारणा दिसून आली. काही रोग्यांनी डायलेसीस घ्यायचे सोडून दिले व ते आता केवळ वैद्य भीडेनी दिलेल्या औषधारवर अवलंबून आहेत. काही किडणी रोग्यानी डायलेसीस चालू न करता ते थेट वैद्य भीडेंनी दिलेले औषध घेतली, त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड न होता चांगली सुधारणा झालेली आहे. काही नियमीत डायलेसिस घेणार्‍या रोग्यांचे डायलेसीस घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे, तसेच त्याची प्रकृती समतोल होत आहे.

वैद्य भीडेंनी जे किडणी रोग्यांना आवाहन केले आहे खास करून जे डायलेसिसला जायच्या मार्गावर आहेत त्यानी काही दिवस आयुर्वेद उपचार पद्धतीने उपचार करावे व डायलेसिस न करता आपली किडणी निरोगी करावी.
अधिक माहितीसाठी भेट द्या  : http://weloveayurved.blogspot.in/

श्रीकांत विनायक बर्वे                                तारीखः 9 जून 2013

संयोजक ‘We Love Ayurved’ 9403175973

No comments:

Post a Comment